Dnyanadeep Academy for MPSC

Strong will along with dedicated smart efforts, not circumstances,determines your success..

एप्रिल २०१३ मध्ये 'विध्यार्थ्यानी विषयार्थ्यांसाठी चालविलेली चळवळ ' या स्वरूपात सुरु केलेली ज्ञानदीप अकॅडमी आता राज्यभराच्या विध्यार्थ्यानी बहरलेली पाहताना थोडेसे समाधान वाटण्यासोबतच प्रचंड जबाबदारीची जाणीव मला आहे.स्पर्धा परीक्षेकडे येताना विध्यार्थी ज्या Energy आणि Pashion ने येतो, तीच Energy आणि Pashion यश मिळेपर्यंत (वा संधी संपेपर्यंत )टिकवून ठेवणे अवघड असत. त्यासाठी असणारे Pemperament सर्वांकडे नसते. विद्यार्थ्यांची चळवळ म्हणून अकॅडमी सुरु करताना या गोष्टी माझ्या डोळ्यांसमोर होत्या.

क्लास लावून पोस्ट काढता येते या विधानाशी मी केव्हाच सहमत नव्हतो, आज हि नाही विद्यार्थी उत्तीर्ण होतात ते खरे तर त्यांच्या स्वतःच्या प्रामाणिक प्रयत्नामुळेच असा माझा विश्वास आहे.या विश्वासाचाच परिणाम म्हणून 'आमच्या अकॅडमी तुन इतक्या-इतक्या उमेदवारांची निवड ' अशी जाहिरात न करण्याची आणि यश्वस्वी नावे वा फोटो जाहिरातीसाठी न वापरन्याची व्यावसाईक नीतिमत्ता ज्ञानदीप अकॅडमी ने पाळली आहे.

विद्यार्थ्यांचा अधिकारी होतानाची निरंतर बदलाची प्रक्रिया, या प्रक्रियेत "ज्ञानदीप अकॅडमी" मोलाची भूमिका आज निभावत आहे. येत्या काळातही "ज्ञानदीप अकॅडमी" विद्यार्थींना स्पर्धा परीक्षांच्या जगात स्वतःचा मार्ग शोधताना योग्य ते मार्गदर्शन करत राहील कारण हि विद्यार्थ्यांनि विद्यार्थ्यांसाठी चालवलेली चळवळ आहे.

एक लक्षात ठेवा...

"चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती
कथा या खुळ्या सागराला,
अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा
किनारा तुला पामराला. "


MPSC Integrated Batch(Prelims+Mains+Interview)

MPSC Prelims
 • MCQ च्या Orientation ने Teaching
 • एक दिवसाआड GS (४० गुण ) व C -SAT (३० गुण ) सराव पेपर (Daily Test )
 • घटकनिहाय सराव पेपर (Chapter wise)
 • विषयनिहाय सराव पेपर (subject wise)
 • सामान्य अध्ययन (Brainstroming Test)
 • नियमित वर्तमानपत्रांचे विश्लेषण व चालू घडामोडींचे विशेष सत्र
 • C-SAT वर जास्तीत जास्त भर
 • C-SAT चा जास्तीत जास्त सराव करून घेण्यात येईल

MPSC Mains
 • दररोज सराव पेपर
 • दार आठवड्याला NCERT च्या पुस्तकांवर आधारित सराव पेपर
 • महिन्याच्या प्रत्येक १५ व ३० तारखेला मराठी इंग्रजी परीक्षेचा सराव
 • Indian Year Book/आर्थिकपाहणी अहवाल यावर कार्यशाळा
 • आठवड्यातील शिकवलेल्या अभ्यासक्रमावर Weekly Test
 • घटकनिहाय व विषयनिहाय सराव पेपर
 • नियमित वर्तमानपत्रांचे विश्लेषण व चालू घडामोडींचे विशेष सत्र
 • विद्यार्थ्यांचे वैयक्तिक समुपदेशन (Counseling)
 • आभायाक्रम पूर्ण झाल्यानंतर आयोगाच्या दर्जा नुसार सराव पेपर
 • मराठी + इंग्रजी वरील लेखी परीक्षेचे Orientation Lecture आणि सराव चाचण्या घेतल्या जातील (व्याकरण नाही)

MPSC Prelims Structure(400)
पेपर विषय गुण वेळ प्रश्न
पेपर-१ सामान्य अध्ययन २०० २ तास १००
पेपर-२ C-SAT २०० २ तास ८०

MPSC Mains Structure
पेपर विषय गुण वेळ
पेपर-१ मराठी + इंग्रजी १०० ३ तास
(पेपर १ लेखी स्वरूपाचा असेल )
पेपर-१ मराठी + इंग्रजी १०० ३ तास
पेपर-२ सामान्य अध्ययन -१ १५० २ तास
पेपर-३ सामान्य अध्ययन -२ १५० २ तास
पेपर-४ सामान्य अध्ययन -३ १५० २ तास
पेपर-५ सामान्य अध्ययन -४ १५० २ तास
पेपर-६ सामान्य अध्ययन -५ १५० २ तास
(पेपर २ ते ६ बहुपर्यायी(Objectives) स्वरूपाचे आहेत.या पेपरला Negative(१/3) गुणपद्धती लागू आहेत )
MPSC Interview

मुलाखतीमध्ये विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्त्वाची चाचणी घेतली जाते.

मुख्य परीक्षेचे ८०० गुण आणि मुलाखतीचे १०० गुण मिळून ९०० गुणांपैकी मिळालेल्या गुंणानुसार अंतिम यादी जाहीर केली जाते.


राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी

राज्यसेवा पूर्व परीक्षा अभ्यासक्रम
 • आयोगाने दिलेला अभ्यास क्रम वाचून काढणे आणि त्यानंतर स्वतः लिहून काढणे.
 • राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका पाहणे(२०१३-२०१७ )यासाठी ज्ञानदीप अकॅडमीच्या राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण 'स्ट्रॅटेजिक 'या पुस्तकाचा आधार घ्यावा.
 • सुरवातीला राज्यशासनाची क्रमिक पुस्तके वाचणे
  • इतिहास - ८ ,११ वी
  • भूगोल - ६-१० वी
  • विज्ञान - ५-१० वी
  • पर्यावरन - ९,११ वी
 • वर्तमानपत्र
  • लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स यापैकी कोणतेही १ वर्तमानपत्र वाचणे.
  • चालू घडामोडीसाठी मासिके वाचणे.ज्ञानदीप express
 • पूर्व परीक्षा पास होण्यासाठी C-SAT वर जास्तीत जास्त भर देणे.
 • C-SAT पेपरमध्ये सरवात जास्त भर Comprehension वर असतो. या मुळे रोज Comprehension चा सराव करावा या साठी महेश शिंदे सरांचे C-SAT stratergist आणि Comprehension हि दोन्ही पुस्स्तके जास्तीत जास्त वेळा सोडवावीत .
 • परीक्षा MCQ ची असल्या मुळे ७५% वेळ Reading आणि २५% वेळ MCQ च्या Practice साठी द्यावा यामुळे उत्तरांमध्ये Accuracy वाढेल.
 • कोणतीही एक चांगली Test Serise लावावी.

सामान्य अध्ययन PAPER-I(200 MARKS)
 1. Current evevts of state,national and international importance(राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या चालू घडामोडी )
 2. History of India(with special reference to Maharashtra)Indian National Movement-भारताचा इतिहास (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह आणि राष्ट्रीय चळवळ )
 3. Maharashtra, India & the World Geography-Physical, Social, Economic, Geography of Maharashtra, India & the World (महाराष्ट्राचा,भारताचा आणि जगाचा भौतिक, सामाजिक व आर्थिक भूगोल)
 4. Maharashtra & India -Polity And Governance, Constitution, Political System,Panchayat Raj, Urban Governance, Public Polisy ,Rights issues, etc.(महाराष्ट्र व ,भारत-राज्य तंत्र व शासन व्यवहार-संविधान, राज्यव्यवस्था, पंचायत राज शहरी शासन व्यवहार, सार्वजनीक धोरणे ,हक्काच्या बाबी इ.)
 5. Economic & social Development Sustainable Development, Poverty, Inclusion, Demographics, Sicial Sectors intiative, etc.(आर्थिक व सामाजिक विकास, शाश्वत विकास दारिद्र समावेशन जनांकिकी सामाजिक क्षेत्रातील उपक्रम)
 6. General issues on Environmental Ecology,Bio-Diversity and climate change - that do not requier subject specialization(पर्यावरणीचे परिस्थितीकी, जैववैविध्य आणि जलवायू परिवर्तन यांवरील सामान्य बाबी)
 7. General Science(सामान्य विज्ञान)
C-SAT PAPER-II(200 MARKS)
 1. Comprehsesion(आकलन क्षमता )
 2. Interpersonal Skills including communication skills.(संवाद कौशल्यासाहित आंतरव्यक्ती कौशल्ये)
 3. Logical resoning and analytical ability(तार्किक व विश्लेषण क्षमता)
 4. Decision making and problem-solving(निर्णय निर्धारण व समस्येचे निराकरण)
 5. Basic numeracy (numbers and their relations, orders of magnitude etc.)(Class X level),Data interpretation.(मूलभूत अंकगणित (अंक आणि त्यांचे संबंध, व महत्वाचे क्रम इ )(दहावीचा स्तर ),माहितीचे अर्थ बोधन (तक्ते ,आलेख,तालिका,माहितीची पर्यप्तात इ.दहावीचा स्तर)
 6. General mental ability(सामान्य बौद्धिक क्षमता )
 7. Marathi and English Language Comprehension skills(Class X/XII level)(मराठी व इंग्रगी भाषिक आकलन कौशल्य )

राज्यसेवा पूर्व परीक्षा-संदर्भ सूची

१.इतिहास

 • महाराष्ट्राचा इतिहास (११ वी चे राज्य शासनाने पुस्तक )
 • महाराष्ट्राचा इतिहास-गाठाळ/कठारे
 • प्राचीन व मध्य युगीन भारताचा इतिहास ज्ञानदीप प्रकाशन-संजय बिरादार ,(तहसिलदार)
 • आधुनिक भारताचा इतिहास-संजय बिरादार ,(तहसिलदार)
२.भूगोल

 • राज्यशासन पाठ्यपुस्तके (५-१२ वी )
 • भूगोल भाग १ आणि भाग २ (ज्ञानदीप प्रकाशन )सुमंत सोळंके (IFS)
 • महाराष्ट्रचा भूगोल (सवदी/दीपस्तंभ)
३. राज्यव्यवस्था

 • Indian Polity- M. Laxmikant
 • पंचायत राज-ज्ञानदीप प्रकाशन-किशोर लवटे(DySP)
 • आपले संविधान-अभयसिंह मोहिते (उप जिल्हाधिकारी ), श्री. विवेक काळे (उप जिल्हाधिकारी ),ज्ञानदीप प्रकाशन
 • भारतीय राज्यव्यवस्था-रंजन कोळंबे
४.अर्थशास्त्र

 • दीपस्तंभ भाग १ व २
 • भारतीय अर्थव्यवस्था-रंजन कोळंबे
५. पर्यावरण

 • जैव विविधता-,पर्यावरण व हवामान बदल-डॉ. प्रदीप डुबल
 • पर्यावरण -युनिक प्रकाशन
६. सामान्य विज्ञान

 • ज्ञानदीप प्रकाशन-सचिन भस्के
 • राज्य शासनाची ५-१० वी क्रमिक पुस्तके.
७. चालू घडामोडी

 • ज्ञानदीप एक्सप्रेस मासिक
 • चालू घडामोडी-ज्ञानदीप प्रकाशन-मिथुन भोसले
 • लोकसत्ता/महाराष्ट्र टाइम्स
8. PAPER-II C-SAT

 • मराठी Comprehesion ज्ञानदीप प्रकाशन-महेश शिंदे
 • अंकगणित व बुद्धिमत्ता-ज्ञानदीप प्रकाशन-प्रमोद चौगुले
 • ज्ञानदीप प्रकाशन-SAT strategist-महेश शिंदे

राज्यसेवा मुख्य परीक्षेची तयारी

MPSC टेस्ट सिरीज

 • MPSC प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका मिळवण्या साठी इथे Click करा...

© 2017 DyandeepAcademy All Rights reserved, Developed by 3d services